वसुंधरा पाणलोट व कृषी विभागाकडून तिमरम येथे जनजागृती पर प्रभातफेरी

78

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत वाटरशेड रथ यात्रा पूर्व नियोजन अंतर्गत मृदू व जलसंधारण विभागाच्या कामे हातात घेऊन आपले शेती व परिसर सुजलाम सुफलाम करण्यास जनजागृती पर तिमरम येथे प्रभात फेरी काढण्यात आले.
हरितक्रांती व पाण्याचे साठे वाढविणे,शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ, सुपीक शेत जमीन, आर्थिक उन्नती आणि आधुनिक यंत्रणा शेती पध्दती यावर कृषी व पाणलोट समिती कार्य करीत असून याची जनजागृती करण्यास शासकीय आश्रम शाळेत वाटरशेड रथ यात्रा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच नागरिक सह तिमरम गावात प्रभातफेरी काढण्यात आले यावेळी झाडे, लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जय जवान, जय किसान असे नारे देण्यात आले.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी निखिल गुरव, मंडळ कृषी खरात,शाळेचे मु.अ.जोत्सना नामनवार,शिक्षक वर्ग घोडाम,कोडापे, मिरालवार,अधिक्षिका जे. एस. कनावार,कृषी सहायक एस. एल. मार्गिया,सरपंच तथा पाणलोट समितीचे अध्यक्ष सरोजा पेंदाम,कृषी पर्यवेक्षक ए. आर. चव्हाण,पाणलोट पथक सदस्य संजय भोयर, गंगाराम आत्राम,डी. सी. झाडे व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.