जय बजरंग क्लब डुम्मे यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कबड्डी व व्हाॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 03 मार्च 2025 पासून ते अंतिम सामन्यापर्यंत क्रीडा मैदान डुम्मे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. अजय भाऊ कंकडालवार माजी जि. प. अध्यक्ष गडचिरोली तसेच सहउद्घाटक मा. श्री. हणमंतुजी मडावी साहेब सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. जोगाजी मडावी पो. पाटील डुम्मे तसेच मा. श्री. कैलास भाऊ उसेंडी सरपंच ग्रा. पं. गुरुपल्ली, विशेष अतिथी मा. श्री. यशवंतजी दहागावकर शिक्षक जि. प. प्रा. शाळा तुमरगुंडा तसेच मा. श्री. दुलसाजी पुंगाटी साहेब सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक या कार्यक्रमास लाभले. स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. अजय भाऊ कंकडालवार माजी जि. प. अध्यक्ष गडचिरोली यांच्या हस्ते पार पडले. पुरूष कबड्डी ‘अ’ गट, पुरूष कबड्डी ‘ब’ गट, वॉलीबॉल, महिला कबड्डी, महिला रस्सी खेच तसेच संस्कृतीक कार्यक्रम अशे विविध उपक्रम या माध्यमातून मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले.उद्घाटन समारंभ कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण मा. प्रज्वल भाऊ नागूलवार काँग्रेस युवा नेते एटापल्ली तथा सचिव आविस यांनी दिले. त्यानंतर मा. श्री. अजय भाऊ कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना आजच्या आधुनिक युगात शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला सुध्दा विशेष महत्व आहे. खेळामुळे युवकांच्या क्रीडा गुणांना चालणा मिळून शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. ग्रामीण भागातून सुध्दा उत्तम खेळाडू निर्माण झाले पाहीजे. कबड्डी हा सांघीक खेळू असून प्रत्येकांनी संघभावनेने खेळून क्रीडा गुणांचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन केले. संचालन अक्षय पुंगाटी यांनी केले. याप्रसंगी अरुणजी दूर्वा गाव भूमीया, ज्ञानेश्वर पुंगाटी पेसा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे सुधाकर गोटा वेनहारा ईलाका अध्यक्ष, डोलेश मडावी तोडसा पट्टी ईलाका अध्यक्ष, नामदेव हिचामी पाणी पुरवठा समिती सभापती न.पं एटापल्ली, तेजस गुज्जलवार पत्रकार इंडियन दस्तक न्यूज, सौ. विमल लेकामी शिक्षिका जि.प. शाळा डुम्मे, अखलेश झाडे शाळा व्यवस्थापण अध्यक्ष डुम्मे, भीमराव देवतळे, सुभाष खोब्रागडे, सौ. मानोबाई सोबूजी लेकामी, राजेश्वरी दुर्वा, सपना झाडे, मधुकर पुंगाटी, तोंदे मडावी,तसेच मंडळाचे अध्यक्ष दुलसा पुंगाटी, उपाध्यक्ष सुधाकर मडावी सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्यगण व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.*