बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची गडचिरोलीत विशाल जनसभा -१६ फेब्रुवारीला

147

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली – मुलनिवासी बहुजन समाज जोडो अंतर्गत विशाल जनसभा राजीव गांधी सभागृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५सायंकाळी ५.०० होणार आहे . या विशाल जनसभेला बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा . वामन मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे . मुलनिवासी बहुजन समाज जोडण्यासाठी चलो गाव की ओर , चलो बुथ की ओर ‘ या अभियानाअंतर्गत समाजात जागृती निर्माण करुन जेल भरो आदोलन व भारत बंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे . भारत बंद करण्याचे कारण की ,ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे . मुलनिवासी बहुजन महापुरुषाचा होणारा अपमान या विरोधात . स्वातंत्याच्या ७५ वर्षानतर आदिवासीची ५ वी व ६वी अनुसुची लागू झाली नाही . त्यामुळे विकासाच्या नावावर आदिवासीचे विस्थापन थांबविले पाहिजे . अशा वेगवेगळ्या मागण्यासाठी जन आंदोलन निर्माण करायचे आहे .
या सभेला घनश्याम अलामे राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ नई दिली व अनिल गेडाम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे.
या सभेचे उद्घाटक म्हणुन आर पीआय जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, विशेष अतिथी मा .खा . मारोतराव कोवासे ,डॉ . शिवनाथ कुंभारे , अभारिप चे रोहिदास राऊत ‘ रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , आदिवासी नेत्या डॉ. सोनाल कोवे , वंचितचे जि.के बारसिंगे , आझाद समाज पार्टीचे जिल्हाप्रमुख धर्मानंद मेश्राम सामाजीक कार्यकर्ता चंद्रशेखर भंडागे , भरत येरमे ‘ गुलाब मडावी , प्रा. शेषराव येलेकर , विलास निंबोरकर , आदिवासी नेते शिवाजी नरोटे , बिआरएसची मिलिंद बांबोळे सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर मुजुमकर , वनिता बांबोळे , वनिता पदा आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत . या सभेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनी घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भोजराज कानेकर , प्रमोद राऊत ‘ डोमाजी गेडाम , अमरकुमार खंडारे , तुळसिराम सहारे , शांतीलाल लाडे व संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे .