शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्या:माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम #jantechaawaaz#news#portal#

45
एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे महाराजस्व अभियान संपन्न














एटापल्ली:-आदिवासीबहुल भागात विविध योजना घेऊन शासन आपल्या दारी येत आहे. या योजनांचा पुरेपूर लाभ घ्या असे आवाहन माजी जि.प. सदस्य तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले आहे.एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे तहसील कार्यालय मार्फत 19 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान कार्यक्रम घेण्यात आले.













 या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी तहसीलदार पि. व्ही.चौधरी,प्रमुख अतिथी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, तालुका कृषी अधिकारी तुषार पवार,विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुकाध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,माजी जि.प. सदस्य कारु रापंजी,उपसरपंच










 दसरु मट्टामी,ग्रामपंचायत सदस्य अजय पदा, नेसो पदा,भास्कर मट्टामी,दसरु पदा, मिरवा पदा,रजनी वैरागडे,नंदा वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना एटापल्ली तालुक्यातील गेदा परिसरात बरेच गावे असून या गावांतील नागरिकांना महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने एकाच मंचावर विविध विभागाकडून विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. एवढेच नव्हे तर या महाराजस्व अभियानातून या भागातील नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र घरपोच दिले जाणार असल्याने नक्कीच या भागातील नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे.











 महसूल विभागामार्फत एटापल्ली तालुक्यात एकूण 5 ठिकाणी महाराजस्व अभियान घेतले जाणार असून या माध्यमातून गरजू लोकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. अशावेळी नागरिकांनी किमान एक दिवस तरी अश्या अभियानात उपस्थित राहून विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेत लाभ घ्यावा, असेही भाग्यश्रीताई आत्राम यांनी मंचावरून आवाहन केले.गेदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानात गेदा, एकनसूर, तांबडा, ताडपल्ली, चंदनवेली, बारसेवाडा आदी गावातील नागरिक उपस्थित होते.या अभियानात जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, जॉब कार्ड,महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,









कृषी विभागामार्फत सिंचन विहिरीचे प्रमाणपत्र, तसेच लाभार्थ्यांना दोन ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.







महाराजास्व अभियानात विविध विभागाकडून स्टॉल लावून नागरिकांना माहिती देण्यात आली. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन पाहणी करतानाच विविध योजनांची माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तहसीलदार पी व्ही चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी टी.ए.मुळे, डी.बी.रामटेके, मीनाक्षी पोरेटी, तलाठी कु.किरण वलके, संदीप जूनघरे, अरविंद शेंडे आदींनी परिश्रम घेतले.