पोलिस मदत केंद्र पेनगुंडा वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातूनआदिवासी पारंपारिक रेला नृत्य स्पर्धा व”*भव्य जनजागरण मेळावा संपन्न

40

  

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. एम रमेश सा.(अपर पो.अधीक्षक  प्रशासन) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. लोढा सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा.श्री. अमर मोहिते सा.उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड , यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र पेनगुंडा येथे *दिनांक 24/12/2024 रोजी आदिवासी पारंपारिक रेला नृत्य स्पर्धा व”*भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
     सदर भव्य जनजागरण मेळाव्याचे अध्यक्ष उप विभागीय पोलिस अधिकारी मा.श्री. अजय कोकाटे सा. व प्रभारी अधिकारी सपोनी गणेश फुलकवर सा. कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून गावचे गाव पाटील मा.मंगेश फकिरा वद्दे , मंगरू चेतू वद्दे, ,प्रमुख पाहुणे म्हणून CRPF चे मा . PI रावत सा.तसेच पोस्टे परिसरातील गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर ग्रामस्थ, तसेच जिल्हा पोलिस अधि./अंम. SRPF अधि./अंम. सीआरपीएफ अधि./अंम.व हद्दीतील 200ते 250 नागरिक उपस्थित होते. 
               सदर जनजागरण मेळाव्याची सुरुवात क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पाहूण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून जनजागरण मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.       
सदर जनजागरण प्रभारी अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच पोउपनि अमोल साळुंके सा. यांनी पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना त्यासाठी लागणारे कागदपत्र बद्दल माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले.
  *   सदर रेला नृत्य स्पर्धेकरिता रेला नृत्य 03 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला विजेत्या संघाला बक्षीस प्रथम- 3000/-, द्वितीय-2000/-, तृतीय-1000/- रोख रक्कम,वितरण करण्यात आले तसेच सर्व मेळाव्याला उपस्थित नागरिकांना अल्पोआहारची व चाय ची व्यवस्था करण्यात आली.
सदर मेळावा यसस्वीरित्या कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यात आला.