आधारभूत खरेदी केद्रावर मका खरेदी करा अन्यथा तिव्र आंदोलन #jantechaawaaz#news#portal#

45

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून  इशारा.










आरमोरी – तालुक्यासह जिल्हात काही भागात उन्हाळी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका लागवड केली परंतु या वर्षात मका पिकासाठी शासनाने आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यां माती मोल भावाने विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसान होत असल्याने शासनाने मार्केटींग फेडरेशन अंतर्गत खरेदी विक्री संस्थेच्या व आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या केंद्रावर मका खरेदी करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा  गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून दिला आहे

.
गडचिरोली जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून परीचित आहे परंतु  काही वर्षांपासून धान उत्पादनात सत्तत घट येत असल्याने आरमोरी तालुक्यातसह जिल्ह्यातील शेतकरी विहीर नदि नाल्यावर किंवा जमिनीवर बोरवेल मारून कृषी पंपाच्या सहाय्याने खरीप हंगामात उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मका पिकाकडे वळुन मका पिक घेत आहेत परंतु दरवर्षी शासनाच्या वतीने मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने मका खरेदी करीत होते परंतु यावर्षी

 शेतकऱ्यांचे मका पिक घरी आले परंतु आधारभूत मका केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांला कमी किमतीत विकण्याची वेळ येऊन  उसवार किंवा बैकाकडुन कज काढुन मका पिक घेत आहेत तो पैसा कसेने देणार या विवंचनेत शेतकरी असल्यामुळे  

आरमोरी तालुक्यासह जिल्हात  मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत  मका केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून दिला आहे.