प्रतिनिधी//
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा मा.श्रीमती सुप्रिया श्री यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री.नानाभाऊ पटोले यांच्या मनीतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आला असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून श्री.गोपाळ कविराज यांना नियुक्ती करण्यात आल.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री.नानाभाऊ पटोले यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. राज्यात प्रत्येक शहरात सोशल मीडिया वॉरियर्स बनविण्याचं आमचं लक्ष्य आहे. या सोशल वॉरियर्सच्या माध्यमातून राज्याचं समोरील प्रश्न राज्यातील जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या योद्ध्यांच्या माध्यमातून विचार आणि सिद्धांतांवर चर्चा करण्यात येणार आहे,
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री.नानाभाऊ पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारव टीका केली. लोकशाही संस्थांची गळचेपी करण्यात येत आहे. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करणं ही आमची जबाबदारी आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री.नानाभाऊ पटोले म्हणाले. आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. राज्यातील जनतेचा आवाज बुलंद करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे.