गट्टा गावातील समस्यांच्या तातडीने निराकरणाची मागणी – ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ग्रामपंचायत गट्टा मार्फत दिले निवेदन

182

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गूज्जलवार

एटापल्ली: गट्टा गावातील विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या असून, ग्रामस्थांनी जिल्हा परिषद गडचिरोली आणि पंचायत समिती एटापल्ली यांच्याकडे निवेदन देत समस्यांच्या तात्काळ निराकरणाची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात विविध मुद्दे मांडले आहेत. त्यात प्रमुख समस्या सरपंचाच्या अनुपस्थितीची आहे. सरपंच महोदय गट्टा मुख्यालयात राहण्याऐवजी तिटोळा गावात वास्तव्यास असल्याने ग्रामस्थांना शासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच गावातील वीजपुरवठा व्यवस्थेतही अनेक अडचणी आहेत. अनेक वीज पोलवरील बल्ब आणि हायमास्ट लाइट बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना अडचण होत आहे.

त्याचबरोबर, ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचारी गावात उपस्थित राहत नसल्याने, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असून, यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. यासोबतच, पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याची समस्या ग्रामस्थांनी मांडली आहे.

गावात नवीन 33/11 सबस्टेशन स्थापन केल्यानंतरदेखील वेगळ्या फीडरची व्यवस्था न झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याशिवाय, जगत टोला आणि गट्टा मार्केट भागातील नालीबांधकाम आणि बोअरवेलच्या कामाचे तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे केलेल्या या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ सचिन मोतकुरवार,मा. सैनुजी गोटामाजी जि प सदस्य,,तानेद्र लेकामी वनहक्क समिती अध्यक्ष ,सुरज जक्कुलवार,रवी अलोणे, मधू नरोटी, विशवनाथ गोटा,नागेश गोटा, नरेश ऊईके, बाजीराव गोटा व रोशन गोटा, गणेश गावडे,श्रीकांत तोप्पा, गणेश तोप्पा,दशरथ तोप्पा,राकेश नरोटी,विकास पुंगाटी,संतोष लेकामी,रोशन नरोटी, अजित गोटा,रवींद्र लेकामी,सुरज लेकामी सह अनेक गावातील युवा वर्ग उपस्थित होते….