जिल्ह्यातील संवेदनशील दुर्गम भागातील नागरिकांचा आरोग्याचा दररोज होतोय खेळ

64

जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड , सीरोंचा , एटापल्ली मुलचेरा, तालुक्यातील आरोग्य केंद्रात आरोग्याच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करा!

कोठी येथील या ब्रेन मलेरिया ग्रस्त महिलेस आर्थिक मदत करा राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे

भामरागड: 15 सप्टेंबर 2024* *गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोठी येथील रहिवासी ममता शोबु गोटा या महिलेला साध्या तापापासून ब्रेन मलेरिया केव्हा झाला तपासणी व उपचाराअभावी कळलेच नाही? तापाचा प्रकोप वाढत जाऊन शेवटी या अतिदुर्गम भागातील महिलेला अहेरी येथून चंद्रपूर येथे हलवण्यात आले पण तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही* *सदर महिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ड क्रमांक तीन बेड नंबर 37 येथे भरती आहे, आवश्यक माहिती अभावी व योग्य उपचार अभावी सदर महिला चे आप्तेष्ट बऱ्याच ठिकाणी फिरत आहे ? त्यांचे कुटुंब सध्या खूप आर्थिक विवंचनेत आहेत व नुकताच मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पुणे प्रणय भाऊ खुणे यांची त्यांच्या आप्तेष्ट यांनी भेट घेऊन आप भीती सांगितले यावेळी प्रणय भाऊ खुणे यांनी त्यांच्या आर्थिक समस्याची जाणीव ठेवून सामाजिक भावनेने त्यांना संघटने कडून आर्थिक मदत केली व गडचिरोली जिल्ह्यातील व प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील नागरिकांना ममता गोटा महिलेस पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे जाहीर आवाहन केले* *व बोलताना सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील ,अहेरी , भामरगड, एटापल्ली , मुलचेरा , सीरोंचा, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या सोयी सुविधा आजही जैसे ते आहेत छोट्या छोट्या उपचारासाठी येथील रुग्णांना गडचिरोली चंद्रपूर नागपूर येथे हलवावे लागते त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांचा या ठिकाणी आरोग्याचा सोयी सुविधा अभावी जीवाचा दररोज खेळ होत आहे या भागातील ज्या सुरजागडच्या भरोशावर हजारो कोटी रुपयाचे खनिज उद्योग होत आहे* *त्या ठिकाणी जिल्ह्यातील विदर्भातील सर्वात मोठे सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णालय उभारावे अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली लवकरच या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा आवाज महाराष्ट्राचे आदरणिय राज्यपाल यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आगामी महिन्यात जिल्ह्याच्या विकासासाठी स्वयंस्फुर्त शंभर युवकांचा मोटरसायकलीचा विराट जन संवाद रॅली काढून जनतेच्या समस्या ऐकून घेणार असे सांगितले व या महिलेस सर्वतोपरी आर्थिक मदत देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मडावी मोबाईल क्रमांक 94 22 93 4202 क्रमांकावर संपर्क साधण्याचे जाहीर आव्हान केले संघटनेचे प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास ,विदर्भ अध्यक्ष जावेद भाई अली ,जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी ,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना दहाडे ,पुरुषोत्तम गोबाळे, महिला आघाडी अध्यक्ष मनिषाताई मडावी, लक्ष्मी कन्नाके, तेजस्विनी भजे, मनीषा आत्राम, शितल चिकराम , भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर स्वप्निल भाऊ कन्नाके व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*