गडचिरोली जिल्हयातील B.ed व D.ed धारकांना कंत्राटी शिक्षक भरतीत प्राधान्याने संधी देण्यात यावे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा यांची मागणी

304

*मा. डॉ. धर्मरावबाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना निवेदन*

गडचिरोली:- गडचिरोली जिल्हयातील B.ed व D.ed धारकांना कंत्राटी शिक्षक भरतीत प्राधान्याने संधी देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या वतीने मा. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हंटले आहे कि, जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषर गडचिरोलीत कंत्राटी शिक्षक भरती घेण्यात येते आहे. त्या पात्र यादी ३१/०८/२०२४ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. त्यात पेसा कायदाची अमंलबजावणी केलेला दिसले नाही. बआणि इतर जिल्यातील उमेदवारांना संधी दिला जात आहे. जिल्यातील D.ed Bed प्रचारकांना, संधीन दिल्यामुळे याच्यावर अन्याय होताना दिसून येत आहे.
B.ed/D.ed जिल्हयातील उमेदवारांकडे शिक्षण पात्रता म्हणजेच TET/CTET नसल्याचे कारण दाखवून अपात्र ठरविल्याचे आहे.
परंतु आदिवासी विकास विभाग कडून चालविल्या जाणाऱ्या अधिम शाळेतील शिक्षण पात्रता पात्रता उतीर्न नसलेल्या शिक्षकांना 5 वर्षाचा शिथिलता मिर्कव्याच प्रसिद्धी पत्रक दि. २० जॉगस्ट २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग कडून निघाला.

तर त्याचप्रमाणे कंत्राटी शिक्षक भरतीत सुद्धा B.ed व D.ed धारका उमेदवारांना शिक्षक पात्रता परिक्षेतून शिथिलता देऊन जिल्हयातील D.ed, B.ed धारकांना संधी देण्यात यावी अशी मागणी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे संघटनेचा वतीने करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट, नंदू मडावी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते.