अहेरी: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असल्याने महिलांचा या योजनेवरचा विश्वास वाढला असुन लाभ मिळावा यासाठी जिकडे तिकडे यासाठी महीला धडपड करीत आहेत.बर्याच ठिकाणी महीलांची लुट देखील सुरु आहे.
राजे अम्ब्रीशराव महाराजांनी जनसंपर्क कार्यालयात महीलांसाठी निशुल्क अर्ज ऊपलब्ध करुन दिले आहेत तसेच अर्ज भरुन देण्याची सोय सुध्दा महीनाभरापासुन केलेली आहे.हजारो महीलांनी या कार्यालयातुन फाॅर्म भरुन घेतले व आजही गर्दी करीत आहेत.