. संजय देशमुख खासदार आणि राहुल चव्हाण राज्य संघटक यांचे गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शिव सर्वेक्षण अभियान अंतर्गत मार्गदर्शन व आढावा बैठक संपन्न

72

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोल्ली : दिनांक १४/०८/२०२४ रोजी सर्किट हाऊस गडचिरोली येथे शिव सर्वेक्षण अभियान अंतर्गत मा. संजय देशमुख साहेब खासदार यांच्या अध्यक्षतेखाली राहुल चव्हाण साहेब राज्य संघटक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री. रियाज भाई शेख जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठक घेण्यात आले.
या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसंबंधी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मा. खासदार संजय देशमुख साहेब यांनी मार्गदर्शन करताना बूथ प्रमुख, बी.एल.ए. पासून तर विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख प्रत्येक गावागावात पक्ष संघटनाची बांधणी जोमाने करावी, गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक, मशाल चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा काम शिवसैनिकांनी कराव तसेच सभासद नोंदणी अभियान राबवून जनसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे समस्या सोडविण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे अस मार्गदर्शनात त्यांनी शिवसैनिकांना आव्हान केले.मा. श्री. राहुल चव्हाण राज्य संघटन यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एक जुटीने पक्ष संघटनाचे कार्य करावे गडचिरोली जिल्ह्यात भगवा झेंडा फडकविण्यासाठी कामाला लागावे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी युवती सेना जिल्हाप्रमुख तुळजाताई तलांडे, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय पुंगाटी, समीर मुखर्जी मुलचेरा तालुकाप्रमुख, सुनील वासनिक तालुकाप्रमुख (ग्रामीण) अहेरी, नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती न.प. एटापल्ली, अरुणाताई निकोडे तालुका संघटिका, शालिनीताई नैताम उपतालुका संघटिका, रघुनंदन जाडी तालुकाप्रमुख सिरोंचा, अक्षय कुडमेथे विभाग प्रमुख अहेरी, रंजीत लेकामी विभाग प्रमुख, ऋषभ दुर्गे शहर प्रमुख, इब्राहिम शेख उपशहर प्रमुख अहेरी, बिपिन मिस्त्री, उपतालुकाप्रमुख मुलचेरा, संजय वैद्य, अविनाश दास, महादेव सरकार अहेरी विधानसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महिला आघाडी, तालुकाप्रमुख, युवासेना, युवतीसेना सर्व पदाधिकारी आढावा बैठकीत बहुसंख्येने उपस्थित होते.