अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा

249

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली,(जिमाका)दि.14: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते 15 ऑगस्ट रोजी इतर मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.45 वाजता सुयोग निवासस्थान गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. इतर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास आरमोरी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता इतर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास चामोर्शी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 2.30 वा. हेलिपॅड पोलिस मुख्यालय येथे आगमन व अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.45 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने लाहेरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते सकाळी 11.40 वा. लाहेरी येथे आगमन व लाहेरी येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक. सकाळी 11.40 वा. लाहेरी येथून नारगुंडाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. सकाळी 11.45 ते दुपारी 12.45 वा. नारगुंडा येथे आगमन व नागरीकांसमवेत संवाद बैठक. दुपारी 12.50 वा.नारगुंडा येथून भामरागडकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. दुपारी 01.30 वा. ते दुपारी 03.00 वा. भगवंतराव आश्रम शाळा, भामरागड येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक. दुपारी 03.00 वा. भगवंतराव आश्रम शाळा, भामरागड येथून हेलिकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.45 वा. प्राणहिता हेलिपॅड, अहेरी येथे आगमन व निवासस्थान अहेरीकडे प्रयाण. दुपारी 04.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
0000