प्रतिनिधी//
जोगीसाखरा – आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे आदिवासी समाजाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त आरमोरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक मंडलिक यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या पुणकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी युवराज सयाम गुरुजी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम माजी सरपंच नामदेव कुमरे पोलिस पाटील राधाबाई सडमाके ग्रा.प.सदस्य शालुताई घोडाम शरद मडावी शामराव
पेन्दाम प्रदिप सडमाके देवराव पेन्दाम रामदास सडमाके रतनाजी पेन्दाम देवराव राऊत शैलेश मसराम चंदु मडावी शालिक वरखडे संतोष भोयर प्रतिभा पेन्दाम प्रेमाला कुमरे यासह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.