शासकीय आधारभूत खरेदी केद्रावर धान मका पिकाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ चुकारे द्या #jantechaawaaz#news#portal#

100
प्रतिनिधी//

न्यथा तिव्र आंदोलन करणार आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून ईशारा










आरमोरी – तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या पावसाळी उत्पन्नात फार मोठा पाहिजे वाढ न झाल्याने आपल्या कुटुंबाचा गाडा चालण्याकरिता शेतकऱ्यांनी उसने उदार करून उन्हाळी धान व मका पिके घेतले असता खाजगी व्यापाराकडे पाहिजे त्या प्रमाणात मोठा वादानाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान व मका पिकाची गेल्या 20 ते 22 दिवसांपूर्वी विक्री केली परंतु आज 

मूलद्र नक्षत्र शेवटच्या टप्प्यावर असताना शासनाने धार व मका पिकाचे चुकारे अजून पर्यंत न दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे यात बहुतेक शेतकऱ्यांनी धान व मका विकून जुने थकीत पीक कर्ज कशाने भरणार आता जर पीक कर्ज भरला नाही समोरच्या पावसाळी पिकासाठी पैसे कुठून आणणार तसेच आता धार्मिक विजय घेण्याची लगबग सुरू झाली आहे परंतु पैसे अभावी  बिजाई औषधी खत घेणे शक्य नाही व व काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे बँकेचे कर्ज भरणे आहे अशा परिस्थितीत शासकीय आधारभूत केंद्रावर  धान व मका विकुणही आज शेतकऱ्यांना पैशासाठी वन वन फिरायची वेळ आली

 आहे त्यामुळे शासनाने शासकीय आधारभूत  खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दान व मक्याचे चुकारे देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून ईशारा दिला आहे.

यावेळी तालुका आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वेश्वर दरौ.   तालुका किसान सेल अध्यक्ष नीलकंठ गोहणे विलास  पोटफोडे स्वप्निल ताडाम  चामोशी ग्राम काँग्रेस अध्यक्ष वामण निबोळ  विष्णु गाईन यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.