प्रतिनिधी:तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली: दिनांक १३/०७/२०२४ ते १६/०७/२०२४ पर्यंत सकाळी ११.०० वाजता ते सायंकाळी ५.०० वाजता पर्यंत समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था एटापल्लीच्या माध्यमातून आपल्या नागरिकांनसाठी आपण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन अर्ज भरून ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यात आले. एटापल्ली हे नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग आहे आणि अनेक महिला अशिक्षित आहेत. या ठिकाणी इंटरनेटची समस्या असल्याने समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात वायफायची सुविधा करण्यात आली.सदर योजना सर्व गरजू व गरीब महिलांना पर्यंत पोहचविणे व या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महिलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये व योजनेचे अर्ज भरण्याचा महिलांचा अनुभव सुखकर व्हावा. या उद्देशातून समर्पण संस्थे मार्फत आपल्या नागरिकांसाठी आपण अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी राघवेंद्र सुल्वावार अध्यक्ष समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था एटापल्ली, राहुल कुळमेथे उपाध्यक्ष, अमोल गजाडीवार सचिव, सुरज मंडल कोषाध्यक्ष, रोहित बोमकंटीवार सहसचिव, संपत पैडाकुलवार सदस्य, अंकित दिकोंडवार सदस्य, ओमकार मोहूर्ले सदस्य, संतोष गंधेशिरवार सदस्य, भाग्यश्री शेंडे सदस्य, शंकर गोलेटीवार सदस्य, सविता गोटा सदस्य यांनी सहकार्य करून पुढाकार घेतला.