मदतीसाठी परत एकदा राजमुद्रा फाऊंडेशन एटापल्ली आले धावून

255

प्रतिनिधी// तेजेश गुज्जलवार

दिनांक १५/०६/२०२४ रोजी गेराॅ ( पंदेवाही) येथे एका महीलेला त्रास होत असल्याचे दूरध्वनी द्वारे नगरपंचायत चे बांधकाम सभापती राघव सुल्वावार कळवताच अनिकेत मामीडवार अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली मनिष ढाली सचिव राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांनी नगरपंचायतीच्या रुग्णवाहिकेने गेराॅ या गावी गेले असता मंजु तलांडे रा. गेराॅ जि.गडचिरोली महिला गंभीर अवस्थेत होती. मात्र लगेच त्या त्रस्त महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेस दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. रुग्णालयात दाखल करेपर्यंत अनिकेत मामीडवार अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली व मनिष ढाली सचिव राजमुद्रा_फाउंडेशन एटापल्ली यांनी त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली.

राजमुद्रा_फाउंडेशन एटापल्ली
समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था एटापल्ली