प्रतिनिधी//
*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष दिलीप घोडाम व आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात नुसतानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा*
आरमोरी – आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेती उत्पन्नात वाढवावी म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे ही जोपासून डोंगरगाव ठाणेगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर बंद नलिका वितरण प्रणालीचे काम हे डोंगरगाव, ठाणेगाव, वासाळा, 1- चक, वनखी, चार्मोशी चार्मोशी माल, आरमोरी, शेगाव या गावातील शेतजमीनीत करण्यात येत असुन
सदर कामामध्ये सर्व सामान्य शेतकऱ्यांना ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या वर्षाचा पीक घेता येणार नाही शेतकरी वर्गाला कुठलीही माहिती न देता त्यांच्या शेतात हजारो हेक्टर शेतीमध्ये पाईपलाईन जागोजागी खोदकाम करून टाकण्यात आले शेतकऱ्यांचे धान शेती काम करण्याचे दिवस सुरू असताना जाणा येण्यासाठी रस्ते जागोजागी भुमिगत गटारे पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले परंतु आता उशिरा बुजविण्याचे काम कत्राटदारानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेती पेरण्यासाठी लागणारे साहित्य ट्रॅक्टर आपल्या शेतीमध्ये नेता येत नसल्याने जवळपास 100 हेक्टर च्या वरून शेतकऱ्यांनी आपल्या शेती पळ्या ठेवलेल्या आहेत तसेच
भूमिगत पाईप टाकण्याचे कामांमध्ये काशिनाथ पिपरे यांच्या शेतजमीनीत सर्वे नंबर 229 मध्ये भेंडीचे उभे पीक होते सदर काम करताना पिकाची नुकसान झालेने भरपाई प्राप्त होणाऱ्या दरानुसार अदा करण्यात येईल असे २९ मेला शेतकऱ्यांना उपविभागीय अभियंता सवैक्षण लघु पाटबंधारे गडचिरोली यांनी लेखी दिले परंतु दो महिने होऊनही पहिलेच भेंडी व ईतर पीकाची नुकसान भरपाई
दिली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आज नुकसानीला समोर जाऊन
कर्जबाजारी होऊन हवालदीप झाले आहे यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचा कमी जास्त केला तर संबंधित अधिकारी व कंत्राटदार जबाबदार राहील यासंदर्भात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांनी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले व आमदार अभिजित वंजारी यांच्या कडे केली असता अधिवेशनात विषय उचलुन धरणार आहेत यात शेतकऱ्यांच्या समस्या वरुण स्वता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली असता जवळपास शंभर हेक्टर चे वर शेतकऱ्यांचे जमिनी पळ्या असल्याचे दिसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे त्यामुळे येणाऱ्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या पळ्या असलेल्या शेतीचे सवै करुण संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावे अन्यथा लघु पाटबंधारे विभाग गडचिरोली व
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली धडक देऊन जाब विचारणार असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात नुसतानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी मोहन पिपरे लिंबाजी पिपरे सुभाष भुरसे घनश्याम पिपरे मंगेश रोहणकर भैयाजी उरकुडे जगदिश रामटेके नेहरू चापले नामदेव ऊईके महादेव ऊईके दादाजी मेत्राम रुपचंद बाळसागडे यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.