प्रतिनिधी//
एटापल्ली :गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला होता व जारावंडीकरांनी जणआक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, कूकर्म करताना एका मुलाने पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला सरड गडचिरोलीला आणावे लागले त्यामुळे त्या पीडितेची हेळसांड झाली व तिला वेळीच प्राथमिक उपचार मिळालं नाही हे सर्व कृत्य येथील आरोग्य केंद्राच्या हलगर्जी पणामुळे झालं असल्याने जारावंडी व परिसरातील नागरिकांनी आरोग्य केंद्रांला टाळे ठोकले त्यामुळे आरोग्य विभाग जग उठून बसला दरम्यान ही माहिती कळताच तात्काळ तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली परंतु येथील संतप्त नागरिकांनी रात्रोभर तालुका आरोग्य अधिकाऱ्याला त्याच आरोग्य केंद्रात डांबून ठेवले हि माहिती कळताच सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी,व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जारावंडी ला भेट देऊन संतप्त नागरिकांना समजावत येत्या पाच दिवसात सर्व समस्यांचा निराकरण करणार आधी ग्वाही देत टाळे ठोकलेल्या आरोग्य केंद्राला सुरू करण्यात आलं
*दोषींवर होणार निलंबनाची कारवाही*
जारावंडी गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकतर याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला प्राथमिक उपचार मिळाले नाही त्यामुळे येथील सर्वच कर्मचारी याला दोषी आहेत असे म्हणत येथील दोषी कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात येईल असे सीईओ यांनी सांगितले
तिसऱ्या दिवशी पोहचले प्रशासन
जारावंडी गावात ९ मार्च रोजी एका नराधामाणे ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. दरम्यान, पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते त्यामुळे संतप्त नागरिकांनी येथील आरोग्य केंद्राला टाळे ठोकले आणि संपूर्ण गावात ताणतणाव निर्माण झाला होता परंतु याची दखल प्रशासणांनी घेतली नव्हती परंतु संतप्त नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला डांबून ठेवल्याने प्रशासनात खळबळ माजली व सलग तिसऱ्या दिवशी प्रशासन गंभीर घेत जारावंडी गाठले यात गंभीर घटना घडून तीन दिवस लोटून सुध्दा प्रशासन गंभीर दखल घेत नाही अशा घटनांबद्दल प्रशासन किती गंभीर आहे असा सवाल करत येथील संतप्त नागरिकांनी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला धारेवर धरले