विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश:मंत्री धर्मराव बाबा

47

अहेरी:तालुक्यातील रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश प्रक्रिया सुरू असून नुकतेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत विविध गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालत सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले.

यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,युवा नेते ऋतुराज हलगेकर,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,अहेरी विधानसभेचे अध्यक्ष लक्ष्मण येरावार,तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार तसेच अहेरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.