राजाराम येतील नवयुवकांचे आर्त मागणी.
राजाराम:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम खां. ग्राम पंचायत च्या वतीने मागील एक वर्षाअगोदर युवकांना व्यायाम करण्याकरीता व्यायामशाळा इमारत मंजूर करण्यात आले आणि इमारतीचे बांधकाम ही पूर्ण होऊन काही महिने लोटलं तरी अद्यापही व्यायाम शाळेत व्यायाम साहित्य उपलब्ध करण्यात आले नाही.करिता व्यायाम शाळेत साहित्य कधी पोहचणार असे सवाल राजाराम चे युवकांनी करीत आहेत आहे.
शासनाने या वर्षी पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती असे अनेक विभागाचे भरती घेत असून पोलीस व वनरक्षक भरती करिता शारीरिक शिक्षणाची गरज भासतो गावात शारीरिक व्यायाम शाळा असणे ही काळाची गरज आहे परंतु राजाराम येथे व्यायाम शाळा मंजूर झाल्याचे कळल्यावर युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला होता मात्र व्यायाम शाळा इमारत बांधकाम होऊन ही अद्याप ही व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले नसल्याने शासनाप्रति युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
व्यायाम शाळा ईमारत का? फक्त बांधकाम कंत्राटदाराचे व टक्केवारी घेणाऱ्याचे पोट भरण्यासाठीच का? असा प्रश्न युवकांमध्ये निर्माण होत आहे. आजच्या युगात कुठल्याही गोष्टींत स्पर्धा करावी लागतो जिल्ह्यात वनरक्षक व पोलीस भरती घेण्यात येत आहे अश्या वेळी
स्थानिकठिकाणीचा व्यायाम शाळा भरती देणाऱ्या युवकांकरिता वरदान ठरतो. तसेच व्यायाम केल्याने शारीरिक विकास होतो आणि आजची पिढी एकमेकांना पाहून व्यायाम शाळेत व्यायाम करण्यास प्रवृत्त होतात.
राजाराम येथील व्यायाम शाळेच्या समस्याकडे संबंधित अधिकारी जातीने लक्ष केंद्रित करून त्वरित साहित्य उपलब्ध करून देण्याचे मागणी राजाराम चे युवक वर्ग करीत आहेत.
नोट- *व्यायाम शाळेचे बांधकाम पूर्ण झालेला आहे तरी आगामी ग्रामसभेत साहित्य उपलब्ध करण्याचे विषय मांडून साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार*
*व्यायाम शाळेचे बांधकाम नुकतेच झाले आहे ग्राम पंचायत चे अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या कडे व्यायाम साहित्याचे विषय मांडले असून त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर साहीत्य उपलब्धता करून साहित्य पुरवठा करण्याचे प्रयत्न करीत आहोत*
*पुण्यवान झाडे*
*ग्रामसेवक*(सचिव )
*ग्राम पंचायत राजाराम*
युवकांचे नोट- *ग्राम पंचायत च्या वतीने व्यायाम शाळा इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झालं परंतु व्यायाम साहीत्य उपलब्ध करून न दिल्यामुळे आम्हा युवकांना शारीरिक शिक्षणाची गरज असून आम्ही त्या पासून वंचित आहोत. शारीरिक स्पर्धेत आम्हाला व्यायामाची गरज आहे तरी ग्राम पंचायत किंवा संबंधित अधिकारी आणि जनप्रतिनिधी दुर्लक्षित करीत आहेत तरी त्वरित व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावी अन्यथा युवक वर्ग ग्राम पंचायत कार्यालयावर धडक देण्यात येईल*
राजाराम येथील युवक
*पंकज पेंदाम, आशिष चंदनखेडे व*
*विक्रांत सिडाम*
*अनिरूध्द मोतकुरवार*
*साहदेव सडमेक*
*रूपेश सडमेक*
*शुभम कंबगोनिवार*