स्वराज्य फाउंडेशन जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा केला सत्कार

126

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

आलापल्ली:-
महाराष्ट्रातील गडचिरोली या शहरात नुकत्याच झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील खेळाडू चमकले.
स्वराज्य फाउंडेशन अल्लापल्लीचे सदस्य रुपेशभाऊ श्रीरामवार , दशरथभाऊ, त्रिशूल डांगरे मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. निकिता मडावी (5 km) प्रथम क्रमांक पटकावला व तसेच अंकिता मडावी (5km) द्वितीय क्रमांक पटकावला.
आलापल्ली गावातील खेळाडू उत्तम कामगिरी करून गावाचे नाव जिल्हास्तरावर नेले म्हणून स्वराज्य फाउंडेशन तर्फे सगळ्या खेळाडू व प्रशिक्षक यांचे सत्कार करण्यात आले.