एटापल्ली येथे होणार बँक ऑफ महाराष्ट्रची नवीन शाखा, राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा प्रयत्नांना मिळाले यश. #jantechaawaaz#news#portal#

50
प्रतिनिधी//

राष्ट्रीयकृत बँकेची नवीन शाखा झाल्याने एटापल्ली शहर तथा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना होणार लाभ.











एटापल्ली तालुका मुख्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रची नवीन शाखा लवकरच उघडली जाणार आहे, ह्याबाबत मंजुरी मिळाली असून जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आले आहे, एटापल्ली येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा व्हावे ह्यासाठी एटापल्ली येथील नागरिक तथा व्यापाऱ्यांनी माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती.














ह्याची दखल घेत तत्कालीन अर्थमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करीत जनतेचा सोईसाठी एटापल्ली येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मंजूर करण्याची मागणी केली होती, त्या मागणीला यश आले असून लवकरच बँक ऑफ महाराष्ट्रची नवीन शाखा एटापल्ली येथे उघडले जाणार आहे.



















एटापल्ली येथे स्टेट बँक इंडिया ( S.B.I. ) ह्या राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे प्रचंड गर्दी व मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याने सर्वसामान्य नागरिक तथा व्यापाऱ्यांना मोठी गैरसोय होत होती, आत्ता एटापल्ली येथे बँक ऑफ महाराष्ट्रची नवीन शाखा झाल्याने एटापल्ली शहर तथा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना मोठी सोय होणार असून त्यांनी राजेंचे आभार मानले आहे.