नक्षलींनी केली आणखी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या;

549

 

अहेरी :
तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम (२७) या तरुणांची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी आढळलेल्या नक्षल पत्रकात तो खबऱ्या असल्याचा दावा केला आहे. दक्षिण गडचिरोली भागात महिनाभरात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
( २४ नोव्हेंबर शुक्रवार) रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कापेवंचा येथील रहिवासी असलेला रामजी हा तरुण आपल्या शेतात काम करीत होता. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्याठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली.