*जनतेचे समस्या सोडवणे हेच माझ्या कर्तव्य आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रतिपादन*

56

#राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला लोकांच्या उत्कृष्ट प्रतिसाद आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रत्येक गावात ढोल ताशा तसेच आदिवासी पारंपारिक नृत्याने स्वागत#
आज राष्ट्रवादी परिवार जनसंवाद यात्रेच्या चौथ्या दिवशी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अहेरी तालुक्यातील खादला या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातुन जनसंवाद यात्रेला सुरू करण्यात आले.त्यादरम्यान मागील अनेक वर्षापासून असलेल्या मुख्य समस्या आदिवासी बांधव व तसेच इतर पारंपारिक बांधवांच्या वन हक्क पट्टे याबाबत येणारा दोन वर्षाच्या कार्यकाळ मध्ये पूर्णपणे वनहक्क पट्टेचा निकाल लावण्याचा प्रयत्न करू अशी आदरणीय धर्मराव बाबा आत्राम उपस्थित समस्त बांधवांना आश्वित केले.
राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी विविध प्रश्न घेऊन येत असलेल्या राजाराम, गुडीगुडम, नंदीगाव, मोसम, वेलगुर रामयापेटा, मदीगुडम ,तसेच अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मुख्य ठिकाण आलापल्ली येथे आपल्या जनतेला काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी जवळपास सकाळी नऊ ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना समोर घेऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तर देत जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. यादरम्यान अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वनहक्क जमिनींचे पट्टे , निराधार महिलांचे समस्या, शेतकरी बांधवांचे शेती संबंधात नुकसान भरपाई समस्या, अनेक गावांमध्ये गावांतर्गत रोड. असे विविध समस्या घेऊन येत असलेला जनतेच्या येणारा अडचण दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये शक्यतो पूर्ण करण्याचे प्रयत्न आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी जनसंवाद यात्रेमध्ये जनते साठी आयोजित कार्यक्रमात पूर्ण करण्याचे आवाहन केले
या आयोजित राष्ट्रवादी परिवार जनसंवाद यात्रेला माजी जि .प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,प.स सदस्य श्री हर्षवर्धन धर्मराव आत्राम, अहेरी विधानसभाचे प्रमुख लक्ष्मण यर्रावार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार , नगरसेवक अमोल मुक्कावार, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलाश कोरेत, पराग पांढरे, सत्यनारायण मेरगा, साबया करपेत, बालाजी गावडे,तसेच विविध गावातील सरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.