आत्मविश्वास मनात ठेवून खेळ खेळावा. प्रभारी अधिकारी मदन मस्के

79

सिरोंचा :-
 आदिवासी जननायक शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीप्रित्यर्थ  बामणी उपपोस्टे येथे व्हालीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
 बामणी उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी मदन मस्के यांनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते सदर स्पर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल , अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे ,कुमार चिंता , यांच्या संकल्पनेतून सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमास बामणी पोस्टेचे मुंडे , पारदे , साहेब  उपस्थित होते
 ग्रामीण भागातून आलेल्या सर्व युवा खेळाडूंचा मनोबल वाडविण्यासाठि प्रत्येक खेळाडूंनी खेळ- खेळतांना हा सामना आपणचा जिंकू हा आत्मविश्वास मनात ठेवून खेळ खेळावा असे आमुलाग्र मार्गदर्शन केले. व प्रथम मुंडे साहेब यांचा उपस्थितीत क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या आलेल्या संघास समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले करण्यात आले.हा कार्यक्रम आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रीत्यर्थ आयोजन करण्यात आला तेव्हा रीतसर भगवान बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला उपस्थित अधिकारी वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी माल्यार्पण करून सामन्याला सुरुवात करण्यात आले.

सदर स्पर्धेमध्ये उपलपोलीस स्टेशन बामणी हद्दीतील वैनेलया ,कांबलपेटा,व्यंकटापूर,बामणी, गर्कपेटा संघ सहभाग घेत प्रथम परितोषिक व्यंकटपूर संघ रोख 3000 हजार बक्षीस, कंबलपेटा व्दितीय क्रमांक येत 2000 हजार रोख रक्कम, तृतीय बक्षीस 1000 रुपये गर्कापेटा संघाने आले आहे. सर्व बक्षिसे सामन्यांनंतर लगेच देण्यात आले होते. सूत्रसंचान इंगडे मेजर केले तर आभार प्रदर्शन मा. पारडे साहेब यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि उपपोलीस स्टेशन चे कर्मचारी तसेच एस आर पी एफ चे कर्मचारी परिश्रम केले.