राज्यपालांच्या निषेधार्थ आरमोरी तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पुतळा जाळून निदर्शने

45

आरमोरी –  छत्रपती शिवरायांची बदनामी राज्यपाल हेतूपुरस्सर करीत असल्याचा आरोप करून आरमोरी तालुका कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोगीसाखरा येथील  शिवाजी चौकात राज्यपालांचा पुतळा जाळून  निदर्शने करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपालांचा विविध स्तरांतून निषेध होत आहे. तसेच राज्यभर विविध संघटना राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करत आहेत. आज  आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे  छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला दुधभिषेक करुन माल्याकन अर्पण करुण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व  तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष संदिप ठाकुर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुणकृती पुतळ्यासमोर राज्यपाल कोश्यारी यांचा पुतळा जाळून  दुपारी ३ वाजता दोन्ही पक्षांचे कार्यर्कत्यांनी निषेध केला . चौकामध्ये जमा झाले. आक्रमक कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. ‘हटाव हटाव राज्यपाल हटाव’, ‘कोश्यारी चले ‘जाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात
राज्यपाल कोश्यारी हे वारंवार हेतूपुरस्सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य करत आहे. त्यांनी तत्काळ राज्यपाल पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी आरमोरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केले
राज्यपालांच्या वक्तव्यामागे मनुवादी विचार असून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य केल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष संदिप ठाकुर यांनी केली.
निषेध करण्यासाठी आरमोरी   तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष संदिप ठाकुर गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वृंदा ताई  गजभिये  गोलु वाघरे निलेश अबादे रुपेश झजालकर घनश्याम कोडापे खेमराज चाटाळे  ग्रा.प.सदस्य अश्विनी घोडाम देवदास ठाकरे गुरुदेव कुमरे स्वनिल गरफडे करीष्मा मानकर ज्योती घुटके प्रतिभा मोहुले हरीदास बावणे प्रतिब सडमाके देवराव राऊत रत्नाजी पेन्दाम सुरेश वझाडे मनोहर ठाकरे नामदेव कुमरे सिताराम कुमरे पंढरी खरकाटे भाष्कर राऊत नामदेव मोहुले आबाजी मोहुले मोरेश्वर राऊत संजय तिजारे शामराव जाभुळे लालाजी राऊत तेजराव कन्नाके  किशोर बारस्कर भाऊराव मडावी विठ्ठल  नखाते रामा गेडाम सुनिल कुमरे राजकुमार भोयर अमर कुमरे किशोर ठेगरी विशाल कुमरे विजु खरकाटे चद्रभान जुगनाके रुषी मांढरे ऊज्वला पेन्दाम  खेमलता  हजारे बाई संगिता ऊईके   गंगाबाई पेन्दाम  यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.