भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात तोडसा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

48

एटापल्ली :तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे सर्व नामनिर्देशन पत्र राकाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम व रायुकाचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापली तालुकाध्यक्ष श्रीकांत कोक्कुलवार, तालुका कार्यकारी अध्यक्ष संभा हिचामी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली तालुकाध्यक्ष तथा येमली चे सरपंच ललिता मडावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इशांत दहागावकर,लक्ष्मण नरोटे,बेबी नरोटे,राजु नरोटे, अभि नागुलवार,जितेंद्र टिकले,दासरू मट्टामी,अजय पदा,दुलसा गोटा,बिरजू मट्टामी,वसंत पुंगाटी, देऊ गावडे, चिन्ना ऋषी नरोटे, प्रेमीला गोटा,भिवा दुर्वा,मीना दुर्वा,अनिता गावडे,गणेश धुर्वा,सुनीता दुर्वा,रमेश गावडे,रैजू गावडे,मुन्नी दुर्वा,बाबुराव गोटा,सुखदेवी उसेंडी तसेच तोडसा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.