अबनपल्लीच्या चिमुकल्यांना मिळणार नवीन अंगणवाडी

45

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले भूमिपूजन

अहेरी:- व्यंकटरावपेठा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट अबनपल्ली गावातील चिमुकल्यांना 16 लाख रुपयांच्या निधीतून नवीन अंगणवाडी इमारत मिळणार आहे.नुकतेच भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी येथील सरपंच निर्लक्का गेडाम उपसरपंच किशोर करमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोर्रेम,महेश कुसराम,बक्काजी मडावी, दिगंबर गर्गम,शिवराम कुसराम,बाबुराव सडमेक,केशराव सडमेक,संन्याशी मडावी,सुरेश गर्गम,राजेश गर्गम,राजेश्वरी मडावी आदी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अबनपल्ली गावातील चिमुकल्यांसाठी नवीन अंगणवाडी इमारत आवश्यक असल्याची मागणी येथील सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे केली होती.त्याअनुषंगाने अबनपल्ली गावातील चिमुकल्यांना अंगणवाडी नूतन इमारत मिळावी म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रयत्न करून निधी खेचून आणली.

तब्बल 16 लाख रुपयांच्या निधीतून नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे.गावातील चिमुकल्यांना नवीन इमारतीतून आता एबीसीडी शिकायला मिळणार आहे. मागणीची पूर्तता झाल्याने अबनपल्ली गावकऱ्यांनी आभार मानले