अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकरी नागपूर अधिवेशनादरम्यान

59

नागपूर:अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकरी नागपूर अधिवेशनादरम्यान उपोषणाला बसले आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी बुधवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घडवून आणली. बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी फडणवीस साहेबांनी दिले. त्यामुळे लवकरच पिडीत शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार आहे  चर्चे दरम्यान मेडीगड्डा प्रकल्प पीड़ित शिष्टाचार मंडळातून १) रामप्रसाद रंगूवार आरडा २) तिरूपति मुद्दाम मद्दीकुंठा ३) विशाल रंगुवार आरडा ४) सुरज दुदीवार अंकिसा आदि उपस्थित होते..*