अहेरी. तालुक्यातील सेवानिवृत्त वनपाल प्रभाकर आणकरी यांना वनविभागात वन वन्यजीव प्रस्थापनासाठी उत्कृष्ट कामे केल्याबद्दल शासनाच्या वनविभागातर्फे राज्याचे वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले वनविभागाच्या वतीने नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आन करी हे अहिरी येथे वास्तव्यात असून यांना चार कोटी वृक्ष लागवड अंतर्गत नियत क्षेत्रात खंड क्रमांक1530 मध्ये 25 हेक्टर मिश्र रोपण व स. न. 16 मध्ये 15 हेक्टर बांबू रो पवन केले. जामगिरी उपक्षेत्रातील नारायणपूर नियतक्षेत्रात मिश्र प्रजातीचे 50 हजार रोपे तयार केले, संयुक्त वन व्यवस्थापन समिती नरेंद्रपूर येथेगौण वनोपज मोहफुले खरेदी विक्री करून334000/- चा नफा मिळवून दिले. ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना युवक नेतृत्व व प्रशिक्षणाकरता प्रोत्साहित करून त्यांचे आरोग्य सुदृढ व नशेपासून मुक्त होण्याकरता योग प्रशिक्षण केंद्र मरकड( पुणे) येथे दहा दिवसीय प्रशिक्षणात 42 लोकांना सहभागी करून घेतले त्यांच्या सत्कार याबद्दल सर्वांकडून कौतुक होत आहे अणकारी यांनी आपल्या यशाचे श्रेय वनविभागातील वरिष्ठ व सहकारी कर्मचारी व मित्रपरिवा र यांना दिले आहे.