मुसाफिर हू मे यारो ना घर है ना ठिकाणा,बस हम तो चले परदेशी

44

  हिवरखेडा:राजस्थान येथील मेंढपाळ मध्यप्रदेश मार्गे  अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात दाखल झाले आहेत. बागायती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरखेड परिसरात शेतातील मुंग, उडीद, ज्वारी, मका ,सोयाबीन, कपाशी आदि  शेतातील पिके खाली झाली असून शेतात जनावरांसाठी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असल्यामुळे  आपल्या उंट , बैलगाडी , मेंढ्या  जनावरांसोबत पूर्ण संसारा सोबत घेऊन परिसरात दाखल झाले आहेत. 
यावर्षी कपाशीवर बोंड अळी आल्यामुळे लवकरच या परिसरातील शेतातील कपाशीचे पीक घेणे पूर्ण झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कपाशीची शेती  जनावराना चाऱ्यासाठी देण्यास शेतकरी मजबूर झाला आहे. 
तसेच सोयाबीन, उडीद मक्का व ज्वारी आदी पिके सुद्धा काढणी झाल्यामुळे पुढील पीक पेरणी करण्या अगोदर सदरहू शेती चाऱ्यासाठी देण्यात येते. परिसरातील शेतात शेकडो एकर हिरवा चारा उपलब्ध असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या मुक्या जनावरांना चारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने राजस्थान व गुजरात मधून मेंढपाळ आपल्या संपूर्ण रहिवासी सामग्रीसह उंट व मेंढ्यासह परिसरात आपल्या पूर्ण परिवारासोबत दाखल झाले आहेत.
मेंढपाळांचे संपूर्ण चित्र बघितल्यावर*
        मुसाफ़िर हूँ यारों
ना घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है
बस चलते जाना
एक राह रुक गयी तो और जुड गयी
मैं मुड़ा तो साथ-साथ  राह मुड़ गयी
हवा के परों पर मेरा आशियाना
मुसाफिर हूँ यारों…
या गीताची आठवण येते.