आरमोरी व गडचिरोल्ली जिल्ह्यातील वाघ अन्य राज्यांच्या वनात स्थलांतरित करणार,वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर.

110

नागपूर:

     नागपूर येथे सुरू असलेल्या हीवाळी अधिवेशनात गुरुवारी सकाळी 9 वाजे सुरू झालेल्या विधानसभेच्या विशेष बैठकीत आमदार कृष्णा गजबे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात वाघ, हत्ती व अन्य हीस्र वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढलेली असुन मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, पिकहानी व नागरीकांच्या घरांचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई देऊनही वारंवार वन्य प्राण्यांचे हल्ले सातत्याने सुरुच आहेत त्यावर जिल्ह्यात वन विभागाचे जलद प्रतिसाद दल (क्युआरटी) स्थापन करून प्रभावी उपाययोजना करण्याबाबत राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरजी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. त्यावर मा.  वनमंत्री यांनी सविस्तर व सकारात्मक उत्तर देताना गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या जलद प्रतिसाद दलाची (क्युआरटी) आवश्यकता असल्याचे मान्य करीत वाघांचा वारंवार संचार असलेल्या गावातीलच तरुण बेरोजगार युवकांचा गट तयार करून त्यांना वन विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येईल व त्या युवकांना मानधन देण्यात येईल त्यामुळे जिल्ह्यात वाघांच्या हल्ले नियंत्रित करता येईल तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्रफळाच्या तुलनेत वाघांना लागणारे अधिवास क्षेत्र अपुरे पडत असल्याने वनातील वाघ गावे व शेतामध्ये येवून मानव-वन्यजिव संघर्ष वाढत आहे. याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील अधिवसापेक्षा संख्येने जास्त असलेले वाघ केंद सरकारच्या परवानगीने मागणी केलेल्या मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड राज्यातील वनात स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केले.*