तेल्हारा आगारात सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ

59

जितेंद्र लखोटीया
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
 तेल्हारा:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या तेल्हारा आगारात बुधवार दि.11 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरक्षितता मोहिमेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येवून सुरक्षितता मोहिमेचा विधिवत पूजा अर्चना करून शुभारंभ करण्यात आला.तेल्हारा आगार व्यवस्थापक संतोष वानेरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षिता मोहिमेचा दि.11 ते 25 जानेवारी पंधरवाडा उद्घाटन समारंभ दि. 11 जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक दीपक जांभळे, अकोला येथील यंत्र अभियंता एन.डी.चव्हाण, डॉ.गो.खे. महाविद्यालय गाडेगाव (तेल्हारा) येथील प्रा.कोरपे एसटी महामंडळाचे तेल्हारा आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक आर. ए.कोळकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला.स्वतःच्या प्रवाशांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी,रहदारीचे नियम पाळा व सुरक्षित पोहोचा.असा सल्ला पीएसआय जांभळे यांनी यावेळी बोलतांना दिला.प्रा.कोरपे यांनी आपल्या मनोगतातून जनतेने वाहतूक नियमाचे पालन करावे व जनतेत जागरूकता वाढवावी असे मत व्यक्त केले. एन.डी.चव्हाण यांनी सुरक्षितता अभियान पंधरवड्याची आवश्यकता सांगितली थांबा,पहा मगच रस्ता ओलांडा हा मंत्र लक्षात ठेवा आपले वाहन आणि जीवन नेहमी सुरक्षित ठेवा जीवन अमूल्य आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा प्रवासा ला निघण्यापूर्वी चाकातील हवा, ऑइल,डिझेल, पेट्रोल,ब्रेक,इंजीन इत्यादी तपासणी करा.असा मार्गदर्शक सूचना देऊन आगार व्यवस्थापक संतोष वानेरे यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली व सुरक्षितता मोहिमेत चालक कर्मचाऱ्यांची भूमिका विशद केली.पी एस राखोंडे यांनी संचालन केले. सुरक्षितता मोहीम शुभारंभ प्रसंगी ए.एम.लाहोडे,ब्ही.पी. बनकर, यांच्यासह चालक,वाहक, कर्मचारी उपस्थित होते.ठाकरे यांनी आभार मानले.