विद्यापीठ सभागृहाला दिडोळकरांचे नाव देण्याचा ठराव रद्द करा-

42

विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची पत्रकार परिषदेतून मागणी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या सिनेट बैठकीत विद्यापीठाच्या नवनिर्वाचीत सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याबाबत घेण्यात आलेला ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लीकन पार्टी, बीआरएसपी, आदिवासी युवा विकास परिषद व सामाजिक कार्यकर्त्यांनी २० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेतून केली. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्टीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत , आदिवासी समाज सेविका तथा साहित्यीक कुसम आलाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोंडवाना विद्यापीठाच्या १७ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या सिनेटच्या बैठकीत विद्यापीठाच्या नवनिर्वाचीत सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक स्व.
दत्ताजी डिगोळकर यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कतिक क्षेत्राशी कोणताही सबंध नसलेल्या व्यक्तीचे नाव सभागृहाला देण्याचा प्रकार निंदनिय आहे. गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासी भागाच्या शैक्षणिक विकासासाठी निर्माण करण्यात आले आहे. जिल्हयाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात या मातीतील अनेक मान्यवरांनी योगदान दिले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला गडचिरोली जिल्हयासाठी मोठे योगदान असलेल्या मान्यवरांची नावे विविध संघटनांनी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष सिनेटच्या सभेत काही सिनेट सदस्यांनी सुचवून देखील त्याकडे डोळे झाक करण्यात आली. जिल्हयातील कोणत्याही मान्यवरांचे विद्यापीठाच्या सभागृहाला नाव न देणे हे या जिल्हयातील थोर मान्यवरांचा अपमान आहे. याचा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी तिव्र शब्दात निषेध नोंदवितो, असे रोहिदास रारूत यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये विविध क्षेत्रातील लोकांना संधी देणे आवश्यक होते. परंतू चुकीच्या पध्दतीने निवड करण्यात आली आहे. थेट निवड झालेल्या सिनेट सदस्यांच्या नेमणुका तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लीकन पार्टी, बीआरएसपी, आदिवासी युवा विकास परिषद व सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतून केली. पत्रकार परिषदेला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्टीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रभारी राज बन्सोड, अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेचे कार्याध्यक्ष विनोद मडावी, आदिवासी समाज सेविका तथा साहित्यीक कुसम आलाम, अंधश्रध्दा निमुर्लन समितीचे विलास निंबोरकर, रेखा शेडमाके, सुधा चौधरी, हंसराज उंदिरवाडे, आनंद कंगाले, प्रतिक डांगे, शहीद विर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष वसंत कुलसंगे, माजी नगसेवक गुलाब मडावी यांच्यासह आदिवासी एम्लाईज फेडरेशन व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.