एटापल्लीसाठी स्वतंत्र वीज फिडरचे लोकार्पण नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व सभापती राहुल कूळमेथे यांच्या पुढाकाराला यश

209

अमित कत्तीवार
तालुका एटापल्ली

एटापल्ली: एटापल्ली शहरातील वाढत्या वीजेच्या गरजा लक्षात घेता मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र विद्युत फिडरचे काम पूर्ण होऊन दि. 07/04/2026 रोजी त्याचे लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना आता अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर स्वतंत्र वीज फिडरचे भूमिपूजन दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत काम पूर्ण करून आज नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले व पाणीपुरवठा सभापती राहुल कूळमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी महावितरणचे कनिष्ठ अभियंता थेरे साहेब, लायनकर साहेब, भाजप शहर अध्यक्ष राकेश तेलकुंटलवार, महेंद्र सुल्वावार तसेच महावितरणचे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व पाणीपुरवठा सभापती राहुल कूळमेथे यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच एटापल्ली शहराला स्वतंत्र वीज फिडर मिळाला असून, शहराच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
नवीन फिडरमुळे वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून नागरिकांना अधिक सक्षम आणि सुरळीत वीजपुरवठा मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.