एटापल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी

309

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : वीर बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त एटापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान “वीर बाबुराव शेडमाके अमर रहे… सेवा सेवा जय सेवा…!” अशा घोषणांनी संपूर्ण एटापल्ली परिसर दुमदुमून गेला. आदिवासी समाजाच्या शौर्यपरंपरेची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या बलिदानाला अभिवादन केले.

या कार्यक्रमास एटापल्ली पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोतीरामजी मडावी साहेब, अक्षय पुंगाटी (अध्यक्ष, आदिवासी गोटुल समिती एटापल्ली), सेवा निवृत्त केंद्रप्रमुख डी. एम. पुंगाटी , नामदेव हिचामी (नगरसेवक), पोलीस हवालदार प्रभाकर नाईक, लोकनाथ गावडे (तालुका महाग्रामसभा कार्यकारी अध्यक्ष, एटापल्ली), उमेश भाऊ पोरतेट, नत्तू दुर्वा, मनीष दुर्गे, तेजस गुज्जलवार (पत्रकार), राजु भाऊ नरोटे, पोलीस हवालदार मसराम , अतुल मट्टामी, साईनाथ पेंदाम, चिट्ठी दुर्वा तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.