एटापल्ली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

154

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

​एटापल्ली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरपंचायत एटापल्ली,पोलीस स्टेशन एटापल्ली आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली शहरात एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या सोहळ्याने एटापल्लीकरांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमासाठी श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रेखाताई मोहूर्ले होत्या.प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे,पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा वणवे,बालविकास प्रकल्प अधिकारी विद्याधर बुर्रीवार यांची उपस्थिती होती. तसेच आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर डॉ.स्वाती रेड्डी,डॉ.प्रीती बुर्रीवार,डॉ.गायत्री शहारे,डॉ.प्रगती कावळे आणि आशाताई अतकमवार यांनीही व्यासपीठ भूषविले.
​याप्रसंगी नगरसेविका निर्मला कोंडबतुलवार,कनिका सरकार, ज्योती दोमलवार,सुरेखा अडगोपुलवार,सुशीला रच्चावार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मधुकर पुल्लूरवार,श्रीनिवास मावनूरवार,मनमोहन मंडल, प्रमोद देवतळे,पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, महेश मोहूर्ले,अनिकेत मामीडवार व महेश पुल्लूरवार उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात अनिता बोमकंटीवार यांनी गायलेल्या सुमधुर स्वागत गीताने झाली. त्यानंतर श्वेता उपाध्या यांनी प्रास्ताविकातून महिला दिनाचे महत्त्व आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.पुजा पुल्लुरवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांची मने जिंकली.

​सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत स्थानिक महिला व युवतींनी विविध कलाप्रकार सादर केले, ज्यामुळे वातावरणात मोठा उत्साह संचारला होता.महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने समाजातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लोकमत सखी मंचच्या स्वयंसेविका दिपाली नल्लावार, छाया मामीडवार,मनीषा आकुलवार,सुरेखा अडगोपुलवार,रेखा हमंद,रेखा कावळे,काव्या पुल्लूरवार, मनीषा गुप्ता,दिपाली सातपुते, सौजण्या अतकमवार,वैशाली खेडेकर व वैशाली पुपरेड्डीवार यांनी परिश्रम घेतले.

​नगरपंचायत,पोलीस प्रशासन, व्यापारी संघटना आणि समस्त एटापल्लीवासीयांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.कार्यक्रमाच्या शेवटी महिलांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.