डूम्मे येथे जय बजरंग क्लबतर्फे भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सवाचा शानदार समारोप; मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा

174

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : एटापल्लीला लागून असलेल्या डुम्मे येथील जय बजरंग क्लब, यांच्या सौजन्याने दि. १६ फेब्रुवारी २०२६ ते दि. २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा मैदान, डुम्मे येथे भव्य ग्रामीण कबड्डी, व्हॉलीबॉल सामने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण अहेरी इस्टेटचे राजे, मा. अंबरीशराव महाराज आत्राम (माजी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली) हे होते, मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही परंतु भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

काल या भव्य क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या समारंभीय अध्यक्षस्थानी मा. प्रसाद पुलूरवार (तालुका अध्यक्ष, भाजपा एटापल्ली) होते. विशेष अतिथी म्हणून मा. राकेश हिरा (तालुका महामंत्री एटापल्ली), मा. राकेश टेलकुंटलवार (पत्रकार, तालुका प्रतिनिधी व्हाईस ऑफ मीडिया एटापल्ली), मा. कैलास उसेंडी (सरपंच, ग्रामपंचायत गुरुपल्ली), मा. बाळू आत्राम (उपसरपंच, ग्रामपंचायत गुरुपल्ली), मा. जोगाजी दुर्वा (गाव भूमिया डुम्मे), मा. दुलसा पुंगाटी (अध्यक्ष, जय बजरंग क्लब डुम्मे), मा. यशवंत दहागावकर सर, मा. सुमन पुंगाटी तसेच मा. सरिता मडावी (महिला पोलीस हवालदार, डुम्मे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
कबड्डी ‘अ’ गट :
प्रथम – ₹२५,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-३)
द्वितीय – ₹२०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-६)
तृतीय – ₹१०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-९)

कबड्डी ‘ब’ गट :
प्रथम – ₹२५,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-१)
द्वितीय – ₹२०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-४)
तृतीय – ₹१०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-८)

व्हॉलीबॉल स्पर्धा :
प्रथम – ₹२५,०००/- (आंबटपल्ली संघ)
द्वितीय – ₹२०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-२)
तृतीय – ₹१०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-१२)

महिला कबड्डी :
प्रथम – ₹१५,०००/- (वटेगट्टा महिला संघ)
द्वितीय – ₹१०,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-३)
तृतीय – ₹७,०००/- (जय बजरंग क्लब डुम्मे संघ-५)

सांस्कृतिक कार्यक्रम – एकेरी नृत्य :
प्रथम – ₹५,०००/- (कु. श्रेया अलोणे, डुम्मे)
द्वितीय – ₹३,०००/- (आयुषी चुनारकर, डुम्मे)
तृतीय – ₹१,५००/- (कु. आराध्या देवतळे व आरोही चुनारकर – समान गुणांमुळे संयुक्त)

सामूहिक नृत्य :
प्रथम – ₹७,०००/- (जय कुपार लिंगो ग्रुप, घोटसूर)
द्वितीय – ₹५,०००/- (जय बजरंग क्लब गर्ल ग्रुप, डुम्मे)
तृतीय – ₹३,०००/- (बुलेट गन ग्रुप, डुम्मे)

या सर्व स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळ व सांस्कृतिक सादरीकरणातून आपली कला व कौशल्य दाखवून दिले. संपूर्ण क्रीडा महोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. जयंत दहागावकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. अक्षय पुंगाटी (युवा सामाजिक कार्यकर्ते, डुम्मे) यांनी केले. या वेळी सर्व खेळाडू व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.