प्रतिनिधी//
आज रोजी सकाळी 8:20 वाजेच्या दरम्यान, कारमेल शाळेच्या शिक्षिका कु ममता भांबोळे, वय- 43, राह – आयटीआय- गोकुळ नगर बायपास रोड, गडचिरोली या शाळेमध्ये जात असताना बी फॅशन मॉल च्या समोर गडचिरोली चंद्रपूर रोडवर शहरांमध्ये, स्कुटी गाडी स्लीप होऊन, खाली पडल्या व शेजारून जात असलेल्या आयशर टेम्पोच्या पाठीमागच्या चाकाचे खाली येऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालय भरती केले होते .उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला





