या जाहिरनाम्याव्दारे सर्व लोकांना सुचित करण्यात येते की, श्री. अशोक लक्ष्मण झाडे रा. मन्नेराजाराम ता. भामरागड जि. गडचिरोली राज्य महाराष्ट्र यांनी त्यांचा मुलगा नामे वेदांत अशोक झाडे रा. मन्नेराजाराम ता. भामरागड जि. गडचिरोली यांचा जन्म मौजा मन्नेराजाराम तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 28/07/2010 रोजी झाला असुन त्यांच्या जन्माची नोंद ग्रामपंचायत, मन्नेराजाराम येथे दर्ज केली नसल्यामुळे सदर जन्माची नोंद दर्ज करण्याबाबतचा आदेश होणेस अर्ज या न्यायालयात सादर केलेला आहे व तसे करण्याचे या न्यायालयाचे विचारधीन आहे.
वरील प्रमाणे जन्माची नोंद दर्ज करण्याचे संबंधात कोणाचे उजर /आक्षेप असल्यास त्यांनी जाहिरनामा प्रसिध्द झाल्यापासुन पंधरा दिवसाचे आत संबंधित गावचे सचिव/ग्रामसेवक तथा निबंधक जन्म-मृत्यु, ग्रामपंचायत, मन्नेराजाराम यांचे कडे अथवा या कार्यालयास लेखी पुराव्यासह आक्षेप/ हरकती नोंदवावी. मुदतीनंतर प्राप्त आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
शिक्का.
किशोर बागडे
तालुका दंडाधिकारी तथा
तहसिलदार भामरागड






