सिरोंचा:
दिनांक 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या केंद्रस्तरीय बालक क्रीडा संमेलनात 13 शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत रंगयापल्ली शाळेने माध्यमिक गटात चॅम्पियनशिप पटकावत यंदाही आपली परंपरा कायम ठेवली.
प्राथमिक गटात मुले व मुली खो-खो दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक, तर प्राथमिक मुले कबड्डी – मेडारम शाळा आणि प्राथमिक मुली कबड्डी – कोटा व कारसपल्ली शाळा यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
बक्षीस वितरण कार्यक्रम उपसरपंच श्री बापूजी आतकरी व उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री मारबोना सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सांगता केंद्रप्रमुख श्री आय. जे. खान यांच्या आभार प्रस्तावाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी उत्तम शिस्त व खेळभावना दाखवत स्पर्धा रंगवली.
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे संघांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक-वर्गाचे विशेष कौतुक करण्यात आले.







