#BhayyashreeTai#व्येंकटापूर येथे अभूतपूर्व सामूहिक विवाह सोहळा संपन्न

97

व्येंकटापुर येथे 69 जोडपे विवाह बंधनात अडकले

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे पुढाकार








अहेरी-:तालुक्यातील धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेले व्येंकटापुर येथील निसर्गरम्य वातावरणात बालाजी देवस्थान मंदिरात रविवार 26 फेबुवारी रोजी अभुतपूर्व सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाले.

     माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी पुढाकार घेऊन अभुतपूर्व विवाह सोहळा यशस्विरित्या पार पाडले.

    या प्रसंगी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, जीवनात विवाह हा महत्त्वाचा टप्पा असून भारतीय संस्कृती, परंपरा व रितीरीवाजानुसार विवाह करणे अत्यावश्यक असून सामूहिक विवाह सोहळ्यामुळे वेळेची व पैशाची बचत होते व एकात्मता दिसून येते असे म्हणत सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असून यापुढेही सामूहिक विवाह सोहळा

 घेण्यासाठी आपन कटिबद्ध व सदैव  तत्पर असून भाग्यश्रीताई आत्राम यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व पटवून वर-वधूना वैवाहिक जीवनाच्या व भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिले.
     या विवाह सोहळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली

 जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, रा.काँ.चे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, व्यंकटापुर उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय कुकलारे, व्येंकटापुर ग्राम पंचायतीचे माजी सरपंच व्यंकुताई आलाम, उपसरपंच चिरंजीव चिमलावार, वटरा ग्रा.पं.चे सरपंच पूजा पेंदाम, उपसरपंच समय्या गावड़े,  देवलमरी ग्रा.पं.चे सरपंच लक्ष्मण कन्नाके, ग्रा.पं.सदस्य सालय्या कंबालवार, रा.काँ.चे

 तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,महिला तालुकाध्यक्ष सारिकाताई गड़पल्लीवार, आरती डुकरे, जयश्री चिल्लवेलवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, श्रीकांत मद्दीवार, अरुण मुक्कावार, सुरेंद्र अलोणे,स्वप्निल श्रीरामवार, ताजु कुळमेथे, बाबूराव तोरेम, मांतय्या आत्राम, सांबया करपेत, शैलेश गेडाम, सुमित मोतकुरवार, रामन्ना कस्तूरवार आदि मान्यवर व असंख्य वरात मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

     सामूहिक विवाह सोहळ्याचे मंत्रोच्चार व मंगलाष्टांग पुरोहित सागर महाराज यांनी केले तर यशस्वीतेसाठी  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.      
     यावेळी कार्यकर्ते व वरातीच्या मंडळीनी ढोल-ताशे,  वाजंत्रीच्या तालावर मनमुरादपणे व धुम्म नाचून आनंदोत्सव केले.

     

 
              बॉक्स

     स्वखर्च व पालकत्व स्वीकारूण सामूहिक विवाहाचे आयोजन








     माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी स्वखर्चातुन व स्वतः पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून ना भूतो..असा सामूहिक विवाह सोहळा संपन्न केले. यावेळी वर वधूना नवीन कपड़े, संसारोपयोगी भेट  वस्तु, ढोल-ताशे, वाजंत्री, भव्य दिव्य मंडप तसेच 69 जोडपयांचे परिवार व निमंत्रित पाहुणे मंडळी व वरातींना महाभोजन दिले. कन्यादानची प्रक्रियाही व जबाबदारी  यशस्वीरित्या पार पाडले. अर्थात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी स्वख़र्च व पालकत्व स्वीकारूण महासामुहिक विवाह पार पाडले.

     यावेळी दस्तूरखुद्द भाग्यश्रीताई आत्राम व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी वरातींना जेवन वाढले व सर्वांसोबत अर्थात सामूहिक रित्या पंक्तित बसून स्नेहभोजनही केले.