रुपेशकुमार राऊत यांना अर्थशास्त्रात आचार्य पदवी

101

जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास ( अतिरिक्त कार्यभार) पदावर कार्यरत श्री रुपेशकुमार राऊत यांना नुकतीच गोंडवाना विद्यापीठाकडून अर्थशास्त्रात आचार्य पदवी बहाल करण्यात आली. ROLE OF NABARD IN AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT OF CHANDRAPUR DISTRICT IN 2009-2018 या विषयावर त्यांनी ऑक्टोबर 2024 गोंडवाना विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. मार्गदर्शक म्हणून त्यांना सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील अर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. शरयु पोतनुरवार यांचे मार्गदर्शन लाभले. ऑनलाईन मौखिक परीक्षा बहिस्थ परीक्षक म्हणून लखनौ येथील डॉ. पूनम वर्मा यांनी घेतली. संशोधन कार्य करणाऱ्यासाठी नियोजन विभागाकडून परवानगी मिळवून देण्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे तत्कालीन संचालक श्री. विजय आहेर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून देण्यात नाबार्ड चे चंद्रपूर जिल्हा विकास व्यवस्थापक श्री तृणाल फुलझेले यांनी सहकार्य केले. आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल जिल्हा नियोजन समिती, गोंदियाचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुनील धोंगडे व इतर अधिकारी/ कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. संशोधन कार्यात पत्नी विजया, व मुले तन्मय व यथार्थ तसेच मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.