अहेरी तालुक्यातील मौजा साकीनगट्टा येथील अंगणवाडी केंद्रात *गरोदर माता आणि बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या संदर्भात गावातील नागरिक आणि वारलू दादा यांनी *मा.सौ. भाग्यश्री ताई आत्राम* यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
तक्रार मिळताच *ताईसाहेबांनी माजी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरी यांना तत्काळ गावात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी तातडीने साकीनगट्टा येथे जाऊन गावकरी बांधवांशी चर्चा केली आणि थेट *मा.सौ.भाग्यश्री ताई आत्राम* यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तसेच गावकरी, नागरिकांशी थेट यांच्याशी दूरध्वनी द्वारे बोलण करून दिले.
पाहणी दरम्यान अंगणवाडी सेविकेने सांगितले.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा आहार पुरविण्यात आला होता.परंतु,या कालावधीत पुरविण्यात आलेले धान्य,दाळ, गहू,तांदूळ या वस्तूंना किड व बुरशी लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
काही पॅकेट्समध्ये तर अळ्या पडल्याचेही आढळले.
गावकऱ्यांकडून विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, सकाळी 10:00 वाजता एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अहेरी, यांनी गावात येऊन पाहणी केली.
चार महिन्याच दिलेल्या आहारात शिल्लक आहार खराब आढळून आले.
, वटाणा,तांदूळ,गहू,दाळ,तेल, तिखट,मीठ आणि हळद यांची पॅकेट्स मुदतबाह्य आढळली.
, ऑक्टोबर महिन्याचा आहार दोन दिवसांपूर्वीच आणून दिला गेलेला आहे.
हा धान्य,आहार व्यवस्थित आहे
या प्रकारानंतर मा. सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
> *गरोदर महिला* आणि *बालकांना* दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही. दोषी पुरवठादार किंवा अधिकारी कोणताही असो — त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाबाबत त्या स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांशी संपर्क साधून कारवाईची मागणी करणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरी स्वतंत्रपणे तपासणी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहणीवेळी अंगणवाडी सेविका, गावातील नागरिक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.