युवा कार्यकर्ते रुपेश सलामे यांनी वाढदिवसानिमित्त केला रक्तदान

64

गडचिरोली :- गडचिरोली येथील उत्साही युवा कार्यकर्ते रुपेश सलामे यांनी दिनांक १०/१०/२०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय , गडचिरोली येथे रक्तदान करून सामाजिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या घोषवाक्याचा प्रत्यय देत त्यांनी समाजासाठी योगदान देण्याचा आदर्श ठेवला. यावेळी त्यांच्या सोबत मित्रपरिवार सुद्धा उपस्थित होता.

आयुष्यात समाजाचं काहीतरी देणं लागतं या विचाराने एक सामाजिक जबाबदारी म्हणून छोटासा उपक्रम मी रक्तदान करुन माझा वाढदिवस साजरा केला.

प्रत्येकाने स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले पाहिजे असा संदेश यावेळी रुपेश सलामे यांनी दिला.

रुपेश सलामे यांनी उपस्थित मित्रपरिवार तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
वाढदिवसानिमित्त समाजहितार्थ घेतलेली ही भूमिका सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरली आहे.