कारगिल चौक मित्र परिवार, गडचिरोली तर्फे माणुसकीचा झरा उपक्रम

67

प्रतिनिधी//

गडचिरोली :- कारगिल चौक (आठवडी बाजार) गडचिरोली येथे कारगिल चौक मित्र परिवार यांच्यातर्फे पाणपोई चे आयोजन करण्यात आले. या पाणपोई ला *माणुसकीचा झरा* असे नाव देऊन कारगिल चौक मित्र परिवारांचे जेष्ठ सदस्य हरबाजी मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मित्र परिवारांचे सदस्य माजी नगरसेवक संजय मेश्राम, निलेश भुरसे, प्रमोद कोट्टावार, किशोर चिचघरे, गुड्डू भाई, हसन शेख, श्रिकांत उपरीकर, विनोद सोमनकर, सतीश बोदलकर, प्रविण जेंगठे, विकेश भुरसे, स्वप्नील जूमनाके व कारगिल चौक मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
आठवडी बाजार येथे बाजारात येणा-यांची पाण्याविना गैरसोय होत होती. नगर परिषद गडचिरोली पाणपोई सुरू करेल अशी आशा होती. पण नगर प्रशासनांच्या दुर्लक्षित पणामुळे कारगिल चौक मित्र परिवार ने *माणुसकीचा झरा* चालू करण्याचा निर्णय घेतला.
आठवडी बाजारात येणा-या जनतेनी कारगिल चौक मित्र परिवारांच्या कार्याची स्तुती केली आहे.