प्रधानमंत्री आयुष्य आरोग्य भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची जिल्ह्याला भेट

26

गडचिरोली- आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबतची आढावा बैठक दि. ०४/०४/२०२५ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे साहेबांचे, गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पहिल्यांदाच आगमन झाले. सदर बैठकीत दिनांक ०१ जुलै २०२४ पासून एकत्रितपणे अमलात आणलेल्या, दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच आयुष्यमान भारत कार्ड वितरण या बाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि त्यावर उपाय काय, लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याची रणनीती काय असेल आणि कार्ड वितरण प्रक्रियेतील गती वाढवण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आले.
जिल्ह्यातील हॉस्पिटल आणि CSC प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीनंतर लगेच जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे डॉ. शेटे म्हणाले. या प्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विषयक बाबी समजून घेऊन, यापुढे जिल्ह्याला उत्तमोत्तम सुविधा पुरविण्यात येतील असे आश्र्वासन दिले.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने, विदर्भ समन्वयक सतीश आकुलवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी, जिल्हा सहसचिव प्रल्हाद मेश्राम तसेच मुल तालुका अध्यक्ष यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन, अध्यक्ष डॉ. शेटे यांचा सत्कार करण्यात आला.