कनेरीतील शिबिरात 40 युवकांनी रक्तदान करत सामाजिक जबाबदारी पार पाडली #jantechaawaaz#news#portal#

41

कनेरी ग्रामपंचायतीच्या वतीने आज दिनांक ०६-०४-२०२३ रोज गुरुवार ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली
. रक्तदान शिबिराला सरपंच तुषार मडावी, उपसरपंच रजनी ब्राम्हणवाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर लाकडे, रेवणनाथ कुकुडकर ग्रामविकास अधिकारी एल टी भांडेकर, डॉ, किशोर ताराम नरेश भाऊ, खोब्रागडे मॅडम,गेडाम डॉ, डोंगरे,नागदेवते,मेश्राम,मारोती कोलते, लोमेश कोलते,देविदास मुळे,आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात कनेरीचे सरपंच तुषार टी मडावी यांच्यासह गावातील युवकांनी, मित्रपरिवार यांनी रक्तदान केले यावेळी श्री गुरुदेव गणेश मंडळ, स्टार युवा सामाजिक संस्थ्या कनेरी टोली, जय माँ दुर्गा मंडळ,नवरत्न गणेश मंडळ,ग्रामस्थ,मित्रपरिवार, पदाधिकारी उपस्थित होते..