मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोली:-सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कॉलनी गोकुळनगर गडचिरोली येथे रयतेचे राजे छं. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष होते . प्रमुख पाहुणे निशा बोदेले , अस्मिती म्हशाखेत्री होते .
भोजराज कान्हेकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की , शिवाजी महाराजांनी मावळे एकत्र करून संघटीत शक्ती निर्माण करुन मावळ्याचे राज्य निर्माण केले आणि मोलांची गुलामगिरीतून मावळ्यांना मुक्त केले . याप्रसंगी निशा बोदेले , अस्मिता म्हशाखेत्री यांनीसुद्धा आपले विचार मांडले .
कार्यक्रमाचे संचालन अरुणा उंदिरवाडे यांनी केले तर आभार प्रेमलता कान्हेकर यांनी मानले .
या कार्यक्रमाला कल्याणी गोंडाणे , अमिता भैसारे , सविता लाटीलवार , सुरेखा ठाकूर , शुभांगी देवगडे , रत्नमाला वाळके , लक्ष्मी साळवे , स्विटी शेंडे , पौर्णिमा गेडाम , सुरज उंदिरवाडे , निरद साळवे , आदि उपस्थित होते .